जम्मू, (पीटीआय) जम्मू आणि काश्मीरमध्ये पोलिस कॉन्स्टेबलच्या 4,002 रिक्त जागांसाठी 5.59 लाखांहून अधिक उमेदवार परीक्षेला बसणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी काल सांगितले. रविवारपासून संपूर्ण केंद्रशासित प्रदेशात ही चाचणी सुरू होणार आहे. यादरम्यान, तरुणांच्या एका गटाने येथे निदर्शने केली आणि वयोमर्यादा शिथिल करण्याच्या आणि परीक्षेचे वेळापत्रक पुनर्संचयित करण्याच्या त्यांच्या मागणीचा पुनरुच्चार केला.